
मंडळी, राज्यात दुष्काळाचं संकट गडद होत असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी राळेगणसिद्धीसाठी विशेष कृती आराखडा तयार केला आहे. विशेष म्हणजे, पुरस्कारांसाठी खर्च होणारे लाखों रुपये आता दुष्काळ निवारणासाठी वापरले जाणार आहेत. दुष्काळासाठी ट्रस्टकडून नेमका किती निधी मिळणार? सगळं सांगतो. पण आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो करायला विसरू नका.
मित्रहो, स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी ट्रस्टच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत पुरस्कारांसाठी खर्च होणारे वीस लाख रुपये दुष्काळासाठी वापरले जातील. गावातील लोकसंख्या, पशुधन, चारा आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन नियोजन केलं जाणार आहे.
पुढील पावसाळ्यापर्यंत जनावरांना पुरेसा चारा, पाणी मिळावं, तसेच शेतकऱ्यांवर जनावरं विकण्याची किंवा छावणीत पाठवण्याची वेळ येऊ नये, हे प्रमुख उद्दिष्ट आहे. चाऱ्याच्या खर्चात गावाचा ५० टक्के सहभाग राहणार आहे. याशिवाय, विहिरी आणि कूपनलिकांमधील पाण्याचा उपसा गरजेपुरता मर्यादित ठेवून पाण्याचं समन्यायी वाटप केलं जाणार आहे. यासाठी येत्या आठ दिवसांत विशेष ग्रामसभा होणार आहे. तुम्हाला हा दुष्काळ निवारण आराखडा कसा वाटतोय? कमेंटमध्ये नक्की सांगा.





