
पाऊस कमी पडला, जमीन खडकाळ आहे, मग शेतीतून लाखोंची कमाई कशी करायची? पारनेरच्या दोन शेतकऱ्यांनी याच प्रश्नाचं उत्तर आपल्या भन्नाट प्रयोगातून दिलंय ! या शेतकऱ्यांनी नेमक काय केलंय ? चला जाणून घेऊयात. पण, आधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, पारनेर तालुक्यातील वाळूज झाप म्हणजेच म्हसोबा झाप येथील सावकार बबन वाळूज आणि सुनील नामदेव केदार यांनी तब्बल १५ एकर माळरानावर तूर आणि डांगर भोपळ्याचं आंतरपीक घेतलंय. या प्रयोगासाठी त्यांनी १५ ट्रॉली शेणखत वापरलं.
तुरीसोबत डांगर भोपळ्याची १०० पाकिटं टोकण पद्धतीने लावली. विशेष म्हणजे, पाण्याचं योग्य नियोजन करण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला. आता या प्रयोगातून नेमकी किती कमाई होणार?
शेतकऱ्यांच्या अंदाजानुसार, अवघ्या ७० ते ८० दिवसांत डांगर भोपळ्यातून १० लाख रुपये, तर तुरीतून १५ लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे. पुणे, चाकण आणि गुजरातमधूनही डांगराला मागणी आहे.
पुढे हे शेतकरी स्वतःची तूर डाळ बनवून थेट ग्राहकांना ऑनलाइन विकण्याचाही विचार करत आहेत. शेतकऱ्यांचा हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा!





