Latest

लाडक्या बहिणींचे १५०० रुपये कधी येणार ? समोर आली नवीन अपडेट !

दसरा संपला, दिवाळी तोंडावर आली, पण लाडक्या बहिणींच्या खात्यात अजूनही १५०० रुपये जमा झालेले नाहीत ! त्यामुळे राज्यातील लाखो लाभार्थी महिलांचं लक्ष आता सरकारच्या निर्णयाकडे लागलं आहे. अशातच आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. काय आहे नवीन अपडेट ? सांगतो. पण आधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळते. मात्र, ऑक्टोबर महिना संपत आला तरी सप्टेंबरचा हप्ता मिळालेला नाही.

आता महत्त्वाची अपडेट म्हणजे, २५ ऑक्टोबरनंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दसऱ्यानंतर होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या हप्त्याबाबत चर्चा होऊ शकते, असा अंदाज आहे. पण थांबा! सरकारकडून अद्याप पैसे जमा होण्याची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही.

त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे मिळून ३००० रुपये एकत्र मिळणार का, याबाबतही सध्या कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. म्हणजेच, महिलांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते. तुम्हाला काय वाटतं? खात्यात कधी जमा होणार पैसे? कमेंट नक्की करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button