Latest

दिवाळीचा फराळ महागला… या डाळींचे भाव ४० टक्क्यांनी वाढलेत, दरवाढीचे कारण काय ?

दिवाळी आली की घराघरांत चकली, चिवडा, शेव आणि बेसनाच्या लाडवांची तयारी सुरू होते. पण यंदा फराळाचा गोडवा महागाईमुळे कमी होण्याची शक्यता आहे !

अहिल्यानगर जिल्ह्यात डाळींच्या वाढलेल्या दरांचा सर्वसामान्यांना फटका बसतोय. पण डाळींच्या किमती किती आणि का वाढल्यात? सांगतो. पण आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा. मंडळी, कमी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचं नुकसान झालं आणि कडधान्यांचं उत्पादन घटलं. त्याचा परिणाम थेट बाजारभावावर झालाय.

गेल्या दीड महिन्यात विविध डाळींच्या दरात तब्बल ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. काही महिन्यांपूर्वी १०० रुपये किलो मिळणारी तूरडाळ आता १५० ते १६० रुपये किलोवर पोहोचली आहे.

एवढंच नाही, तर गेल्या दहा महिन्यांत किराणा मालाच्या किमती सरासरी २५ टक्क्यांनी वाढल्याचं सांगितलं जातंय. खाद्यतेलही लिटरमागे २० ते ३० रुपयांनी महागलं आहे.

त्यामुळे यंदा दिवाळीचा फराळ बनवताना गृहिणींना खर्चाचा हिशोब करावा लागणार आहे. त्यात बाजारातील पुरवठा कमी राहिला, तर दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या घरातही महागाईमुळे दिवाळीच्या फराळाला कात्री लावावी लागणार का? कमेंटमध्ये नक्की सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button