
यंदा दसऱ्याला अहिल्यानगरमध्ये नवा रेकॉर्ड सेट होणार आहे. मी असं कां म्हणतोय? सांगतो. पण आधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, दसऱ्याच्या निमित्ताने नागरिकांनी खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी केलीय. गेल्या नऊ दिवसांत चारचाकी वाहनांची तब्बल १०३ बुकिंग झाल्याची माहिती आहे. यातून १२ कोटी रुपयांहून अधिक उलाढालीचा अंदाज व्यक्त केला जातोय.
दुसरीकडे, घर खरेदी करणाऱ्यांसाठीही दसरा शुभ ठरतोय. मागील वर्षाच्या तुलनेत फ्लॅट आणि रो हाऊसच्या बुकिंगमध्ये २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचं क्रेडाईचे अध्यक्ष गिरीश अग्रवाल यांनी सांगितलंय.
सोन्याच्या बाजारातही मोठा बदल झालाय. मागील वर्षी दसऱ्याच्या सुमारास १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख ८५ हजार रुपये होता. यंदा तो सुमारे १ लाख ४५ हजार रुपयांवर आहे. म्हणजेच तब्बल ४० हजार रुपयांची घट!
विशेष म्हणजे, स्मार्ट वॉच, रिस्ट बँड आणि स्मार्ट रिंगसारख्या गॅझेट्सनाही मागणी वाढतेय. पण, तुम्ही यंदा दसऱ्याला काय खरेदी करणार? सोनं, गाडी की घर? कमेंटमध्ये सांगा!





