Latest

दिवाळीत फटाके वाजवता येणार की नाही ? न्यायालयाच्या आदेशाबाबत अहिल्यानगर फटाका व्यापारी असोसिएशनने काय सांगितलं ?

गेल्या काही दिवसांपासून दिवाळीत फटाके वाजवण्यावर बंदी आल्याची चर्चा सुरू आहे. मग प्रश्न उभा राहतो, खरंच असा निर्णय झालाय का ? चला जाणून घेऊयात. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी अहिल्यानगरमधील फटाका व्यापाऱ्यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या आदेशाचा संदर्भ देत, सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्याबाबतच निर्बंध असल्याचं व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी सांगितलं.

त्यांच्या म्हणण्यानुसार, फटाके विक्री किंवा उत्पादनावर बंदी असल्याचा उल्लेख या आदेशात नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. घरासमोर, गल्लीबोळात किंवा अपार्टमेंटच्या पॅसेजमध्ये फटाके वाजवता येतील, असा दावा बोज्जा यांनी केला आहे.

त्यांनी फटाका व्यवसायावर अनेक कुटुंबांची उपजीविका अवलंबून असल्याचं सांगत व्यापाऱ्यांनी विक्री सुरू ठेवण्याचं आवाहन केलं आहे. पण यंदा तुम्ही दिवाळीत फटाके वाजवणार की पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करणार ? कमेंटमध्ये नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button