
नवरात्रोत्सव संपत आलाय, पण यंदा घटाचं उत्थापन नेमकं कधी करायचं, यावरून अनेकांच्या मनात प्रश्न आहे. २० ऑक्टोबरला की २१ ऑक्टोबरला? चला, सोप्या भाषेत समजून घेऊया. पण त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, यंदा २० ऑक्टोबरला नवमी आणि दशमी तिथीचा संयोग असल्यामुळे घट विसर्जनाच्या तारखेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
धर्मशास्त्रानुसार, सूर्योदयाच्या वेळी असलेल्या तिथीला महत्त्व दिलं जातं. त्यामुळे अनेक ठिकाणी बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी सकाळी देवीच्या घटाचं उत्थापन आणि विसर्जन करण्याची परंपरा पाळली जाणार आहे.
मात्र, काही घरांमध्ये नवमीच्या दिवशी संध्याकाळनंतरच नवरात्र उठवण्याची प्रथा आहे. त्यामुळे आपल्या घरातील परंपरेनुसार विधी करणं महत्त्वाचं ठरतं. घटाचं उत्थापन करताना आधी देवीची पूजा करा. त्यानंतर कलशातील पाणी घराच्या चारही दिशांना शिंपडा आणि उरलेलं पाणी तुळशीला अर्पण करा.
देवीला नैवेद्य दाखवून आरती करा. दसऱ्याला सरस्वती पूजन, शस्त्रपूजन आणि वाहनपूजनालाही विशेष महत्त्व आहे. पण, तुमच्या घरी घटाचं उत्थापन २० तारखेला होणार की २१ तारखेला ? कमेंट करून नक्की सांगा!





