Latest

नमो शेतकरी योजनेचे ४ थकीत हप्ते कधी मिळणार ? समोर आली धक्कादायक माहिती

दुष्काळाचं संकट, वाळून गेलेली पिकं आणि हातात पैशांची चणचण… अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची प्रतीक्षा आहे. पण ज्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा आधार शेतकऱ्यांना मिळायला हवा, त्याच योजनेचे हप्ते तब्बल पावणेदोन वर्षांपासून थकीत असल्याची माहिती समोर आली आहे.

मंडळी, जानेवारी २०२५ पासून या योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही. मागील वर्षातील तीन आणि यंदाच्या वर्षातील एक असे प्रत्येकी दोन हजार रुपयांचे चार हप्ते थकीत आहेत. म्हणजेच पात्र शेतकऱ्यांना आठ हजार रुपयांची प्रतीक्षा आहे.

विशेष म्हणजे, पीएम किसान योजनेचे पैसे वेळेवर मिळत असताना राज्य सरकारच्या हप्त्यांना विलंब होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. मदतीची रक्कम दोन हजारांवरून तीन हजार रुपये करण्याची घोषणा झाली होती; मात्र आधीचे पैसेच मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा प्रश्न कायम आहे.

दरम्यान, कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी निधी देण्यासाठी सध्या छाननी सुरू असल्याचे सांगितले आहे. आता प्रश्न एवढाच, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे नेमके कधी जमा होणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button