Latest

दैठणे गुंजाळच्या सरपंचांचा मुंबईत गौरव…. बंटी वस्ताद गुंजाळ यांना ‘कर्मवीर पुरस्कार’ !

गावाच्या विकासासाठी सातत्याने काम करणाऱ्या दैठणे गुंजाळचे सरपंच बंटी वस्ताद गुंजाळ यांचा मुंबईत विशेष सन्मान करण्यात आला आहे. सामाजिक, कृषी आणि जलसंधारण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना ‘कर्मवीर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

अखिल भारतीय राजपुताना महासंघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

पाणी अडवा-पाणी जिरवा, नदी-नाला आणि तलाव खोलीकरण, जलसंधारण, रस्ते सुधारणा तसेच विविध सामाजिक आणि कृषी उपक्रमांमधून बंटी वस्ताद यांनी गावाच्या विकासाला चालना दिली आहे.

कै. सहादू तात्या गुंजाळ यांचा समाजसेवेचा वारसा पुढे नेत त्यांनी लोकसहभागातून विकासाची दिशा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
या पुरस्कारामुळे दैठणे गुंजाळच्या ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा सन्मान त्यांच्या कार्यासोबतच गावकऱ्यांच्या सहभागाचाही गौरव असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button