Latest

दुष्काळात तेरावा महिना….अहिल्यानगरमधील तब्बल 40% ऊस खराब ! ‘या’ किडींच्या हल्ल्यामुळे ५ तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला…

आधीच उसाला पाणी कमी… आणि आता किडीचा घाला! अहिल्यानगरच्या ऊस लागवड केलेल्या शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं राहिलंय !

मंडळी, अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने दिलेला खंड, ढगाळ वातावरण आणि वाढलेली आर्द्रता यामुळे उसावर पायरीला आणि हुमणी किडीचा प्रादुर्भाव वाढल्याचं समोर आलं आहे.

श्रीगोंदा, राहुरी, राहाता, कोपरगाव आणि संगमनेर तालुक्यांतील अनेक भागांत ऊस पिकाला याचा फटका बसत आहे. सध्या जिल्ह्यातील सुमारे ३० ते ४० टक्के ऊस क्षेत्र या किडीच्या प्रादुर्भावाने बाधित असल्याचं दिसून येत आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना नियमित ऊस पिकाची पाहणी करण्याचा सल्ला दिला आहे. पायरीला नियंत्रणासाठी काही मित्रकीटकांचा वापर करता येतो.

प्रादुर्भाव सुरुवातीच्या अवस्थेत असल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जैविक कीटकनाशकांची फवारणी करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. चांगला पाऊस झाल्यास प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, पाऊस नसलेल्या भागातील शेतकऱ्यांनी वेळेत उपाययोजना करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button