Latest

डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे अच्छे दिन…नगरमध्ये नवा रेकॉर्ड…; ‘या’ मार्केटमध्ये डाळिंबाने गाठला ३०५ रुपयांचा टप्पा !

राहाता बाजार समितीत बुधवारी डाळिंबाची मोठी आवक झाली. तब्बल ४ हजार ७३४ कॅरेट डाळिंब बाजारात दाखल झाले. यामध्ये दर्जेदार नंबर १ डाळिंबाला किलोमागे तब्बल १८१ ते ३०५ रुपयांपर्यंत भाव मिळाला. म्हणजेच सर्वोच्च भाव ३०५ रुपये किलोपर्यंत पोहोचला.

नंबर २ डाळिंबाला १११ ते १८० रुपये, तर नंबर ३ डाळिंबाला ५१ ते ११० रुपये किलो भाव मिळाला. नंबर ४ डाळिंबाचा भाव १० ते ५० रुपये किलो राहिला.

डाळिंबासोबतच इतर फळांचीही बाजारात आवक झाली. पेरूच्या २१ कॅरेटची आवक झाली असून त्याला किमान ५०, कमाल ९० आणि सरासरी ७० रुपये किलो भाव मिळाला.

तर संत्र्याच्या ७ कॅरेटची आवक झाली. संत्र्याला ८ ते २८ रुपये किलो दर मिळाला असून सरासरी भाव १८ रुपये राहिला. पण, मंडळी तुमच्या जवळील मार्केटमध्ये डाळिंबाला काय भाव मिळतोय ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button