Latest

Jio, Airtel सह सर्वच कंपन्यांचे रिचार्ज स्वस्त होणार! TRAIचा ‘हा’ नवा निर्णय ठरणार गेमचेंजर

मोबाईलमध्ये इंटरनेटचा वापर न करणाऱ्या ग्राहकांसाठी TRAIचा नवा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. TRAIने २१ सप्टेंबर २०२६ रोजी टेलिकॉम कंपन्यांसाठी नवे नियम जारी केले आहेत. यानुसार Jio, Airtel आणि Viसारख्या कंपन्यांना फक्त कॉलिंग आणि SMSची सुविधा असलेले स्वतंत्र रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून द्यावे लागतील.

सध्या अनेक प्लॅनमध्ये कॉलिंग, SMSसोबत डेटा दिला जातो. पण डेटा वापरत नसतानाही ग्राहकांना त्याचे पैसे मोजावे लागतात. आता अशा ग्राहकांना डेटा नसलेला पर्याय निवडता येईल.

उदाहरणार्थ, २८ दिवसांचा डेटा असलेला प्लॅन असेल, तर त्याच कालावधीचा डेटा नसलेला प्लॅनही द्यावा लागेल. डेटा नसल्याने त्याची किंमत कमी ठेवावी लागेल; मात्र TRAIने ठराविक दर निश्चित केलेला नाही.

याशिवाय महिन्याला त्याच तारखेला रिचार्ज करता येईल, असा किमान एक प्लॅनही कंपन्यांना द्यावा लागेल. हे नियम राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर ३० दिवसांनी लागू होतील. मात्र सर्व रिचार्ज स्वस्त होतील, असा याचा अर्थ नाही. पण, डेटा न वापरणाऱ्या ग्राहकांना मात्र नवा पर्याय मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button