
देशभरातील बँक ग्राहकांसाठी महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. २८ सप्टेंबरपासून देशव्यापी तीन दिवसीय बँक संपाची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, इंडियन बँक्स असोसिएशन आणि नाबार्डच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.
संपाच्या काळात ग्राहकांना आवश्यक बँकिंग सेवा सुरळीत मिळाव्यात आणि संभाव्य अडथळे कमी करता यावेत, यासाठी या बैठकीत आपत्कालीन नियोजनावर चर्चा होणार आहे.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करण्यासह पेन्शन लाभांमध्ये सुधारणा आणि काही कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा पर्याय देण्याची मागणी केली आहे.
२६ आणि २७ सप्टेंबरला शनिवार-रविवार असल्याने, २६ ते ३० सप्टेंबरदरम्यान शाखांमधील कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोख व्यवहार, चेक क्लिअरन्स आणि शाखा सेवा प्रभावित होऊ शकतात. अंतिम निर्णय आणि सेवांवरील प्रत्यक्ष परिणाम संबंधित बँकांच्या सूचनेनुसार स्पष्ट होईल.





