
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अकोले तालुक्यातील समीकरणांना अचानक कलाटणी मिळाली आहे.
मोग्रस विकास सेवा सोसायटीने आपला जुना ठराव बदलून माजी बँक अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या नावाने नवा ठराव केला. त्यामुळे सोसायटी मतदारसंघातील इच्छुकांच्या गणितावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अंतिम मतदार यादीत जिल्हाभरातील ३ हजार ८३६ मतदार पात्र ठरले असून, प्रारूप यादीच्या तुलनेत १५९ मतदार वाढले आहेत.
अकोल्यात गायकरांना सोसायटी गटातून बिनविरोध संधी मिळाल्यास अनुसूचित जमातीच्या राखीव जागेसाठी आमदार किरण लहामटे, माजी आमदार वैभवराव पिचड आणि अमित भांगरे यांच्यातील स्पर्धेकडे लक्ष लागणार आहे.
दरम्यान, अगस्ती साखर कारखाना, जिल्हा बँक आणि आगामी सहकार राजकारणाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. मोग्रसच्या ठरावानंतर अकोल्यातील पुढची राजकीय चाल कोणती असेल, याची उत्सुकता वाढली आहे.





