Latest

डॉक्टर, वकील, शिक्षक आणि पोलिस…..; सिस्पे इन्फिनिटी घोटाळ्याच्या तपासाला नवं वळण ! नेमक प्रकरण काय ?

अहिल्यानगरसह राज्यातील हजारो गुंतवणूकदारांना अल्पावधीत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या ‘सिस्पे इन्फिनिटी प्रकरणात तपासाला नवं वळण मिळाले आहे.

पोलीस तपासानुसार, आतापर्यंत तब्बल ७ हजार गुंतवणूकदारांनी फसवणूक झाल्याचे जबाब नोंदवले आहेत. यामध्ये डॉक्टर, वकील, शिक्षकांसह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.

अहिल्यानगर, पुणे, नाशिक, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील नागरिकांनी गुंतवणूक केल्याची माहिती आहे. प्रकरणाच्या व्याप्तीमुळे अहिल्यानगर, सुपा आणि श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांचा एकत्रित तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.

या प्रकरणात आतापर्यंत १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. कंपनीच्या सुमारे ११४ कोटी ९३ लाख रुपयांच्या मालमत्ता जप्तीच्या प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळाली आहे. बँक खाती, डिमॅट खाती आणि स्थावर मालमत्तेतून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया न्यायालयाच्या आदेशानंतर होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button