Latest

अहिल्यानगर महापालिकेला इंग्रजी कारभार चर्चेत ! शहराचा विकास आराखडा चक्क इंग्लिशमध्ये; महापालिकेला मराठीचं वावड का ? नागरिकांचा संताप

अहिल्यानगर शहराचा पुढील विकास कसा होणार, कुठे रस्ते होणार, कुठे उद्याने, शाळा, रुग्णालये किंवा इतर सुविधा प्रस्तावित आहेत… हे ठरवणारा शहर विकास आराखडा नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. पण या आराखड्यामुळेच आता नागरिकांसमोर नवा प्रश्न उभा राहिला आहे.

महापालिकेने खुला केलेला तब्बल ३७५ पानी विकास आराखडा प्रामुख्याने इंग्रजी भाषेत आहे. आरक्षणे, सर्वे क्रमांक, प्रस्तावित वापर आणि नकाशांवरील माहिती समजून घेण्यासाठी नागरिकांना इंग्रजीचा आधार घ्यावा लागत आहे.

विशेष म्हणजे, आपल्या मालमत्तेवर आरक्षण पडले आहे का, भविष्यात त्या जागेचा वापर कशासाठी होणार आहे, हे तपासणे सामान्य नागरिकांसाठी अवघड ठरत आहे. त्यामुळे काही नागरिकांनी थेट वकिलांची मदत घेण्यास सुरुवात केली आहे.

या आराखड्यावर नागरिकांना ९ ऑक्टोबरपर्यंत सूचना आणि हरकती नोंदवता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांची मागणी स्पष्ट आहे—विकास आराखडा केवळ खुला न करता, तो समजेल अशा मराठी भाषेतही उपलब्ध करून द्यावा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button