Latest

अभिनेत्री प्राजक्ता माळीचे गुपचूप लग्न उरकलंय का ? नव्या लूकमुळे चर्चांना उधान

प्राजक्ता माळी पुन्हा एकदा तिच्या खास लूकमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती शॉर्ट हेअर, काठपदराची साडी आणि गळ्यात सुंदर ‘रखुमाई मंगळसूत्र’ अशा पारंपरिक अंदाजात दिसत आहे. यामुळे प्राजक्ता माळी यांचे लग्न झाले की काय? अशा चर्चा सोशल मीडियामध्ये सुरू झाल्यात.

अनेक चाहत्यांच्या नजरा तिच्या मंगळसूत्राकडे वळल्या. मात्र, हे तिच्या लग्नाचं चिन्ह नसून तिच्या ‘प्राजक्तसाज’ या दागिन्यांच्या ब्रँडचं खास डिझाइन आहे.

प्राजक्ताने नुकतंच ‘रखुमाई मंगळसूत्र’ लाँच केलं होतं. विशेष म्हणजे, लाँचनंतर काही तासांतच हे मंगळसूत्र सोल्ड आऊट झाल्याची माहिती तिने दिली. सुरुवातीला मंगळसूत्र तिच्याकडे नसल्याने ती ते दाखवू शकली नव्हती.

नंतर ते सापडल्यानंतर तिने स्वतः परिधान करून त्याचा लूक चाहत्यांना दाखवला. महिलांच्या पसंतीनुसार या मंगळसूत्राच्या डिझाइनमध्ये बदल करण्याचाही विचार सुरू आहे. त्यामुळे पुढे याचे आणखी पर्याय पाहायला मिळू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button