Latest

हृदय पिळवटून टाकणारी घटना…! नगर-मनमाड महामार्गावर मंगळसूत्र चोरट्यांनी घेतला महिलेचा जीव; पतीच्या डोळ्यांसमोर पत्नीचा मृत्यू

मंगळसूत्र वाचवण्याच्या प्रयत्नात एका ६५ वर्षीय महिलेचा जीव गेला… नगर-मनमाड महामार्गावर घडलेल्या या धक्कादायक घटनेने परिसर हादरला आहे.

कोपरगाव शहराजवळील भास्कर वस्ती परिसरात मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. अलका पोपट क्षीरसागर या पतीसोबत दुचाकीवरून उंदीरवाडीला परतत होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढण्याचा प्रयत्न केला.

अचानक झालेल्या या झटापटीत अलका क्षीरसागर यांचा दुचाकीवरून तोल गेला आणि त्या रस्त्यावर कोसळल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

विशेष म्हणजे, परिसरात मंगळसूत्र चोरीच्या घटना वाढल्याने त्यांनी सोन्याचे खरे मंगळसूत्र घरी ठेवले होते आणि सुरक्षेसाठी बेन्टेक्सचे मंगळसूत्र घातले होते.

मात्र, चोरट्यांनी ते सोन्याचे असल्याचे समजून हिसकावण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button