Latest

एसटीमध्ये २४ प्रवासी, अचानक स्टेरिंग तुटले अन एसटीबस हॉटेलमध्ये घुसली, त्यानंतर.. अहिल्यानगरमध्ये थरार

अहिल्यानगरमध्ये एक मोठा थरार घडला. २४ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचे अचानक स्टेरिंग तुटले आणि काही क्षणातच बस थेट एका हॉटेलमध्ये घुसली. मंडळी, ही घटना टाकळी खातगाव परिसरात रात्री सुमारे दहाच्या सुमारास घडली.

विठ्ठलवाडी, ठाणे येथून अहिल्यानगरकडे येणारी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची सीएनजी बस तारकपूरच्या दिशेने येत होती. बसमध्ये तब्बल २४ प्रवासी प्रवास करत होते.

बस चालक बाबाजी गंधाक्ते हे गेल्या ११ वर्षांपासून एसटी महामंडळात चालक म्हणून काम करत आहेत. प्रवास सुरू असतानाच अचानक बसच्या पुढील स्टेरिंग साईडचा पार्ट तुटला आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

क्षणातच बस रस्त्याच्या कडेला असलेल्या निळकंठ हॉटेलमध्ये घुसली. या धडकेमुळे हॉटेलचा अर्धा भाग अक्षरशः उद्ध्वस्त झाला. छताचे पत्रे, टेबल-खुर्च्या, फर्निचर, फ्रिज आणि गेटचे मोठे नुकसान झाले.

सुदैवाची बाब म्हणजे या भीषण अपघातात मोठी जीवितहानी टळली. रात्रीची वेळ असल्यामुळे हॉटेलमध्ये गर्दी कमी होती, अन्यथा मोठा अनर्थ घडू शकला असता. मंडळी, एसटी बसच्या सुरक्षिततेबाबत आता पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. अचानक स्टेरिंगचा पार्ट तुटण्यामागे नेमकं कारण काय, याची चौकशी होणे गरजेचे आहे. तुम्हाला काय वाटत? कमेंट करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button