Latest

अबब! दीड एकरात ५० टन कांद्याचे उत्पादन; अहिल्यानगरच्या शेतकऱ्याची कमाल

अहिल्यानगरमधून एक प्रेरणादायी आणि थक्क करणारी बातमी समोर आली आहे. शेतीतून काही होत नाही, असं म्हणणाऱ्यांसाठी हा शेतकरी जिवंत उदाहरण ठरला आहे.

मंडळी, शेवगाव तालुक्यातील आव्हाणे बु. येथील शेतकरी सर्फराज कंकर सय्यद यांनी अवघ्या दीड एकर क्षेत्रातून तब्बल ५० टन कांद्याचे उत्पादन घेतले आहे. म्हणजेच एकरी जवळपास ३३ टन उत्पादन.. जे अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का आहे.

ही कमाल कशी झाली? तर सय्यद यांनी पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर केला. आंबा बागेमध्ये आंतरपीक म्हणून त्यांनी साडेतीन फुटांच्या बेडवर मल्चिंग आणि ठिबक सिंचनाच्या मदतने कांद्याची लागवड केली. शेवगाव तालुक्यातील हा पहिलाच असा प्रयोग मानला जात आहे.

या प्रयोगामुळे पाण्याची बचत झाली, उत्पादन वाढले आणि खर्चावरही नियंत्रण मिळाले. योग्य नियोजन आणि आधुनिक पद्धती वापरल्यास शेतीतून चांगला नफा मिळू शकतो, हे त्यांनी दाखवून दिलं आहे.मंडळी या शेतकऱ्यासाठी एक लाईक तर बनतोच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button