
१९ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचे चित्र पूर्णपणे बदलणार आहे का? शेतकरी आणि नागरिकांसाठी ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार, १९ जुलैपासून राज्यातील अनेक भागांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
३० जुलैपर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यांत दररोज भाग बदलत पावसाची हजेरी लागेल, असा त्यांचा अंदाज आहे. विशेष म्हणजे, ज्या भागांत आतापर्यंत समाधानकारक पाऊस झालेला नाही, त्या ठिकाणीही या कालावधीत पाऊस पोहोचू शकतो. त्यामुळे रखडलेल्या पेरण्यांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मात्र, पावसाचे प्रमाण आणि ठिकाण दररोज बदलू शकत. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्थानिक हवामानाचा अंदाज आणि अधिकृत सूचना लक्षात घेऊनच शेतीची कामे नियोजनबद्ध पद्धतीने करावीत. पुढील काही दिवस राज्यातील मान्सूनची वाटचाल अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.





