
नगरकरांनो, पुढील काही दिवस घराबाहेर पडताना काळजी घ्या. २२ जुलैपासून ४ ऑगस्ट २०२६ पर्यंत संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
सण-उत्सव, विविध कार्यक्रम, व्हीआयपी दौरे आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
या काळात पाचपेक्षा अधिक जणांनी विनाकारण एकत्र येणे, विनापरवानगी सभा किंवा मिरवणुका काढणे, घोषणाबाजी करणे, ध्वनीक्षेपकांचा वापर करणे तसेच शस्त्रे, काठ्या, तलवारी, दगड किंवा स्फोटकांसारख्या वस्तू बाळगण्यावर निर्बंध असतील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा स्पष्ट इशाराही प्रशासनाने दिला आहे.
त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अधिकृत सूचनांचे पालन करा आणि गरज असल्यासच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करा. ही महत्त्वाची माहिती आपल्या मित्र-परिवारापर्यंत नक्की पोहोचवा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका.





