
गेली ३० वर्षे चर्चेत असलेला नाशिक–पुणे रेल्वे मार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मंडळी, नाशिक–पुणे रेल्वेसाठी मंजुरीनंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, प्रकल्पाच्या मार्गात बदल करण्याचा निर्णय झालाय. यामुळे लोकप्रतिनिधी आणि नागरिक आक्रमक झाले आहेत.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रेल्वे मंत्रालयाला इशारा देत, नाशिक–पुणे रेल्वे प्रकल्पात कोणताही अडथळा आणू नये, तसेच नगर आणि शिर्डीचा स्वतंत्र विचार करावा, अशी मागणी केली आहे. खासदार अमोल कोल्हे, राजाभाऊ वाजे आणि इतर लोकप्रतिनिधींनी सुद्धा फडणवीस यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडवण्याची मागणी केलीये.
दरम्यान, या मुद्द्यावर समृद्धी महामार्ग रोखण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन एक महिन्यासाठी स्थगित करण्यात आले आहे.
आता पुढील महिनाभरात ठोस निर्णय झाला नाही, तर सिन्नर आणि नाशिक रोड येथे मोठे नागरिक मेळावे घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता हा तीस वर्षांचा प्रश्न तीस दिवसात सुटणार का याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.





