Latest

ब्रेकिंग : श्रीरामपूरमध्ये दिवसाढवळ्या गँगवॉर ! गोळीबाराने परिसर हादरला, २० वर्षांचा तरुण रक्ताच्या थारोळ्यात !

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात भरदिवसा असा थरार घडला की, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. दोन गट आमनेसामने आले आणि काही क्षणांतच परिसर रणांगण बनला!

श्रीरामपूरमधील पूर्णवादनगर येथे गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. दोन्ही गटांमध्ये आधीपासून वाद असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेदरम्यान शुभम राजनारायण यादव (वय 20) हा तरुण गंभीर जखमी झाला.

त्याच्यावर प्रथम साखर कामगार रुग्णालय, श्रीरामपूर येथे उपचार करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारांसाठी त्याला अहिल्यानगर येथे हलवण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, घटनास्थळी गावठी कट्टा वापरल्याची चर्चा आहे. मात्र, शुभम यादवला खरोखर गोळी लागली का, हे सोनोग्राफी आणि वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. जखमीचा जबाब आणि तपासानंतरच ही घटना गँगवॉर होती की अन्य कारणामुळे झाली, हे स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे पूर्णवादनगर आणि थत्ते ग्राउंड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button