Explained

पत्नीचे चुलत सासऱ्यासोबत अनैतिक संबंध… शेवटी ३६ वर्षीय पतीने घेतला टोकाचा निर्णय ! कर्जतमधील धक्कादायक घटना

पत्नीचे चुलत सासऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे. कर्जत तालुक्यातील या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

मंडळी, कर्जतच्या मिरजगावमधील शाहूनगर येथे धम्मसागर घोडके या ३६ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृताच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, धम्मसागर यांच्या पत्नीचे चुलत सासरे शांताराम घोडके यांच्यासोबत गेल्या दीड वर्षांपासून कथित अनैतिक संबंध होते.

या संबंधांमुळे धम्मसागर यांना मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे. इतकंच नाही, तर २५ ऑक्टोबरला शांताराम, त्यांचा मुलगा आणि पत्नीने धम्मसागर यांना मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करत आहेत. मात्र, या घटनेने एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. तर मग मंडळी तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button