Latest

पतीसाठी पत्नी झाली देवदूत…‘त्या’ एका निर्णयाने पतीला जीवनदान ! नेवासामधील हृदयस्पर्शी घटना

काही नाती शब्दांनी नाही, तर त्यागातून सिद्ध होतात! अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील शिरेगावमध्ये असंच एक हृदयस्पर्शी उदाहरण समोर आलंय.

शिरेगावचे अॅड. गंगाधर रंगनाथ तुवर, वय ४० वर्षे, हे गेल्या दोन वर्षांपासून किडनीच्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपणाचा पर्याय सांगितला आणि संपूर्ण कुटुंबासमोर मोठं संकट उभं राहिलं.

मात्र, या कठीण काळात पत्नी दीपाली गंगाधर तुवर, वय ३५ वर्षे, यांनी असा निर्णय घेतला, ज्यामुळे पतीला नवं आयुष्य मिळालं. त्यांनी स्वतःची किडनी पतीला दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला.

छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात डॉ. श्रीगणेश बर्नेला यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसांपूर्वी ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या दाम्पत्याला दोन मुलं आहेत. आई-वडील दोघेही सुखरूप घरी परतणार असल्याने कुटुंबीयांसह शिरेगाव परिसरात आनंदाचं वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button