Latest

मृत व्यक्तीचे कपडे, दागिने, घड्याळ, बूट-चपला का वापरू नयेत ? शास्त्र काय सांगत ?

घरात एखाद्या दिवंगत व्यक्तीच्या वस्तू आहेत ? त्या वापरण्यापूर्वी थांबा… धार्मिक मान्यतेनुसार काही वस्तू वापरणं अशुभ मानलं जातं!

गरुड पुराणाशी संबंधित काही धार्मिक मान्यतांनुसार, मृत व्यक्तीच्या वापरातील वस्तूंमध्ये त्यांच्या आठवणी आणि ऊर्जा राहते, असं मानलं जातं. त्यामुळे काही वस्तू इतरांनी वापरू नयेत, अशी परंपरा आहे. यामध्ये सर्वात आधी येतात कपडे.

मृत व्यक्तीचे कपडे वापरणे अशुभ मानले जाते. त्यानंतर दागिन्यांचा उल्लेख केला जातो. मौल्यवान दागिने असतील तर ते वापरण्याऐवजी स्मृती म्हणून जपून ठेवण्याची प्रथा काही ठिकाणी आहे.

मृत व्यक्तीचं घड्याळही दुसऱ्याने वापरू नये, अशी धार्मिक धारणा आहे. त्याचप्रमाणे बूट-चपला आणि वापरलेली भांडीही वापरणं टाळावं, असं सांगितलं जातं.

मात्र, या गोष्टी धार्मिक आणि सांस्कृतिक मान्यतांवर आधारित आहेत; त्यांना वैज्ञानिक तथ्य म्हणून पाहू नये. पण तुम्ही अशा धार्मिक मान्यता ऐकल्या आहेत का ? कमेंटमध्ये नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button