Latest

तुमच्या घरी येणारं प्रत्येक पार्सल खाकी रंगाचंच का असतं ? कारण ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल !

ऑनलाईन शॉपिंग केल्यानंतर घरपोच येणाऱ्या पार्सलकडे आपण फारसं लक्ष देत नाही. पण कपडे असोत, पुस्तके असोत किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू… अनेक पार्सल्सचा बाहेरचा बॉक्स किंवा रॅपर खाकी रंगाचा दिसतो.

मग हा रंगच का? तर, यामागे मुख्य कारण आहे पार्सल तयार करण्यासाठी वापरला जाणारा क्राफ्ट पेपर. हा कागद प्रामुख्याने लाकडाच्या लगद्यापासून तयार केला जातो. त्याच्या नैसर्गिक तपकिरी-खाकी छटेमुळे तयार होणाऱ्या बॉक्सचा रंगही तसाच दिसतो.

यासाठी वेगळा रंग देण्याची गरज नसते. त्यामुळे पॅकेजिंग प्रक्रियेत रंग देण्याचा अतिरिक्त खर्च आणि प्रक्रिया टाळता येते. याशिवाय क्राफ्ट पेपर मजबूत असल्याने वस्तूंच्या वाहतुकीदरम्यान पॅकेजिंगला आधार मिळतो.

म्हणजे पार्सलचा खाकी रंग हा केवळ एक स्टाइल नाही, तर वापरल्या जाणाऱ्या कागदाच्या स्वरूपाशी संबंधित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button