Latest

अहिल्यानगरमध्ये विधान परिषदेत कोण जाणार ! ‘ही’ नावे चर्चेत, ‘असे’ आहे संख्याबळ

अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्याच्या राजकारणात हालचालींना वेग आलाय. अनेक मोठी नावं चर्चेत आली आहेत. गडाख, तनपुरे, घुले, जगताप, कोतकर अशा मातब्बर नेत्यांची नावं सध्या राजकीय वर्तुळात जोरात फिरत आहेत.

या मतदारसंघाची खास गोष्ट म्हणजे येथे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती हे मतदार असतात. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अद्याप झालेल्या नसल्यामुळे यावेळी फक्त नगरसेवकच मतदान करणार आहेत.

भाजपकडून अजून अधिकृतपणे मोठं नाव समोर आलेलं नाही. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांचं नाव चर्चेत आहे. ते भाजपचे उमेदवार असू शकतात, असा राजकीय तर्क लावला जातोय.

भाजपकडून सत्यजित कदम यांचं नावही चर्चेत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी आमदार चंद्रशेखर घुले आणि सचिन जगताप यांची नावं चर्चेत आहेत.

महाविकास आघाडीकडून शंकरराव गडाख मैदानात उतरू शकतात, अशीही चर्चा रंगली आहे. कोतकर परिवार पुन्हा सक्रिय होणार का, आणि संदीप कोतकर काय भूमिका घेणार, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

आता आकडेवारी पाहिली तर भाजपकडे १९९, अजित पवार गटाकडे ५०, शरद पवार गटाकडे ३५, शिंदेसेनेकडे ४८, काँग्रेसकडे २९ तर इतरांकडे १०० मतदार आहेत. म्हणजेच या निवडणुकीत आकडेमोड, आघाड्या आणि राजकीय रणनीती खूप महत्वाची ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button