
अहिल्यानगर जिल्ह्याने आता एक अनोखा राजकीय विक्रम आपल्या नावावर केलाय. सहकार, कृषी आणि शिक्षण क्षेत्रातील नेतृत्वासाठी ओळखला जाणारा हा जिल्हा आता राज्यातील सर्वाधिक आमदार असलेला जिल्हा ठरलाय. मंडळी, सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातून विधानसभेचे 12 आणि विधान परिषदेचे 7 असे एकूण 19 आमदार प्रतिनिधित्व करत आहेत.
यात भाजपचे राधाकृष्ण विखे (शिर्डी), मोनिका राजळे (शेवगाव-पाथर्डी), विक्रमसिंह पाचपुते (श्रीगोंदा), अक्षय कर्डिले (राहुरी), डॉ. किरण लहामटे (अकोले), आशुतोष काळे (कोपरगाव), काशिनाथ दाते (पारनेर) आणि संग्राम जगताप (अहिल्यानगर शहर), विठ्ठल लंघे (नेवासा) , अमोल खताळ (संगमनेर), काँग्रेसचे हेमंत ओगले (श्रीरामपूर) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार (कर्जत-जामखेड), असे एकूण 12 आमदार विधानसभेत तर, विधान परिषदेमध्ये सभापती प्रा. राम शिंदे (कर्जत-जामखेड), अमित गोरखे (श्रीगोंदा), सुनील कर्जतकर (जामखेड), विवेक कोल्हे (कोपरगाव), शिवाजीराव गर्जे (पाथर्डी) , नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, आणि आता नवनिर्वाचित प्राजक्त तनपुरे असे सात सदस्य जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत आहेत.
मंडळी, यामुळे अहिल्यानगर जिल्ह्याचे विधानसभेत आणि विधान परिषदेत मिळून एकूण 19 आमदार झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात जिल्ह्याचे महत्त्व आणखी वाढले असल्याचे मानले जात आहे.





