Latest

‘वॉर्म नाइट्स’ चा आरोग्यास धोका ! दिवसा ऊन अन रात्रीही उकाडा ; शरीर ‘रिकव्हर’ होईना

दिवसा कडक ऊन आणि आता रात्रीही उकाडा, त्यामुळे शरीराला मिळणारी नैसर्गिक विश्रांतीच धोक्यात आली आहे. ‘वॉर्म नाइट्स’ हा प्रकार आता आरोग्यासाठी मोठा धोका बनत चालला आहे.

सध्या दिवसा तापमान ४० ते ४२ अंशांच्या दरम्यान आहेच, पण रात्रीचे तापमानही सरासरीपेक्षा ३ ते ४ अंशांनी जास्त राहत आहे. म्हणजेच २४ तास उष्णतेचा सामना करावा लागत आहे. यालाच ‘वॉर्म नाइट्स’ असं म्हटलं जातं आणि डॉक्टरांच्या मते हा एक ‘सायलेंट किलर’ ठरू शकतो.

कारण रात्री शरीर थंड न झाल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. झोपेतच चक्कर येणे, अस्वस्थता वाढणे, अगदी गळपटून जाण्याचे प्रकारही घडू शकतात. इतकंच नाही, तर शरीराचं तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी हृदयालाही रात्री जास्त मेहनत घ्यावी लागते.

वैज्ञानिक भाषेत शरीराची जी नैसर्गिक कूलिंग प्रक्रिया असते, तीच या उकाड्यामुळे बिघडते. म्हणूनच या दिवसांत विशेष काळजी घेणं खूप गरजेचं आहे. दर तासाला पाणी पिण्याची सवय ठेवा. रात्री झोपताना खोलीत हवा खेळती राहील याची काळजी घ्या. हलके, सैल सुती कपडे वापरा.

मंडळी, ‘वॉर्म नाइट्स’ हा छोटा विषय नाही तो तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम करणारा आहे. त्यामुळे वेळेत सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button