Latest

व्हायरल व्हिडिओ भोवला; पोलिस हवालदार निलंबित

गुंतवणूकदाराकडून लाच घेतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि पोलीस दलात खळबळ उडाली. या व्हिडिओत आर्थिक गुन्हे शाखेतील हवालदार दिनेश राठोड हा तब्बल दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना स्पष्टपणे दिसत आहे.

व्हिडिओ व्हायरल होताच पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी तात्काळ दखल घेत कठोर कारवाईचे आदेश दिले. चौकशीअंती हवालदार दिनेश राठोड याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

विशेष बाब म्हणजे, आर्थिक गुन्हे शाखा स्थापन झाल्यापासून राठोड हा सातत्याने याच शाखेत कार्यरत होता. इतक्या वर्षांत त्याची एकदाही बदली झाली नव्हती, त्यामुळे आता याच “स्थिर नियुक्ती”बाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

गुंतवणूकदाराकडून लाच घेण्याचा हा प्रकार आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यपद्धतीवर आणि विश्वासार्हतेवर मोठे प्रश्न निर्माण करणारा ठरला आहे. पोलीस दलातील भ्रष्टाचाराचा हा आणखी एक नमुना समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून, दोषी आढळल्यास आणखी कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या घटनेमुळे संबंधित शाखेतील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button