Latest

महाराष्ट्रातील ‘या’ 265 दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये ट्रिगर – 1 लागू….पण ट्रिगर-1 म्हणजे काय? शेतकऱ्यांना कोणकोणते लाभ मिळतात?

दुष्काळ जाहीर झाला… पण ट्रिगर-1 लागू झाल्यावर शेतकऱ्यांना नेमकं काय मिळतं? आणि पीक नुकसानभरपाईही मिळते का? चला सोप्या भाषेत समजून घेऊयात. मंडळी, राज्यातील 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, या भागात ट्रिगर-1 लागू करण्यात आला आहे.

ट्रिगर-1 म्हणजे दुष्काळाची परिस्थिती गंभीर असल्याचे निदर्शक आणि त्यानुसार तातडीच्या उपाययोजना सुरू करण्याचा महत्त्वाचा टप्पा. यामध्ये जमीन महसुलात सवलत, पीक कर्जाच्या पुनर्गठनाची प्रक्रिया, कर्जवसुलीस स्थगिती, वीजबिलात सवलत, परीक्षा शुल्कमाफी यांसारख्या उपाययोजना लागू करता येतात.

तसेच टँकरने पाणीपुरवठा, चारा उपलब्ध करून देणे, रोजगाराच्या कामांना चालना, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आणि पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती अशा उपाययोजनांचाही समावेश होतो. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा… ट्रिगर-1 लागू झाला म्हणजे पीक नुकसानभरपाई थेट मिळत नाही.

पीक नुकसानीसाठी पंचनामे आणि शासनाने ठरवलेले स्वतंत्र निकष पूर्ण करावे लागतात. म्हणजेच ट्रिगर-1 हा मदतीचा मार्ग मोकळा करणारा टप्पा आहे; थेट नुकसानभरपाईचा आदेश नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button