Latest

24 तास आणि 3 बळी ! नगर, श्रीगोंदा आणि अकोले…; एकाच दिवशी तिघांनी संपवलं जीवन

अहिल्यानगर जिल्ह्यात २५ जून रोजी घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरला आहे. अवघ्या एका दिवसात तिघांनी गळफास घेऊन जीवन संपवल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

पहिली घटना नगर तालुक्यातील आगडगाव येथे घडली. अर्जुन नारायण कराळे (वय ५५) यांनी राहत्या घरी गळफास घेतला. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दुसरी घटना श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे घडली. झुंबर विठ्ठल लबडे (वय ३२) यांनी इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे सकाळी उघड झाले.

तिसरी घटना अकोले तालुक्यातील चितळवेढे येथे घडली. बाळासाहेब बाबाजी आरोटे (वय ५९) यांनी आपल्या घरात लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतला. त्यांनाही रुग्णालयात नेल्यानंतर मृत घोषित करण्यात आले.

या तिन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येमागील नेमके कारण काय आहे याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button