Latest

प्रतीक्षा संपली ! अहिल्यानगर जिल्ह्यातील ८४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ४ ऑगस्टला अंतिम मतदार यादी जाहीर होणार

अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे! जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२६ या काळात मुदत संपलेल्या आणि नव्याने स्थापन झालेल्या तब्बल ८४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे.

प्रभागनिहाय आरक्षण निश्चित झाल्यानंतर आता मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकांसाठी १५ एप्रिल २०२६ रोजी अस्तित्वात असलेली विधानसभा मतदार यादी आधारभूत मानली जाणार आहे.

२४ जुलै रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर २४ ते २९ जुलैदरम्यान नागरिकांना हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहेत. तर ४ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे.

संगमनेर, पारनेर, पाथर्डी, श्रीगोंदा, नगर, नेवासा, कर्जत, अकोले यांसह जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. आता ग्रामपंचायतींच्या निवडणुका नेमक्या कधी होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button