Latest

सुपर एल निनोचा धोका वाढला ! पुढच्या ६ महिन्यांत तब्बल इतक्या लाख लोकांचा मृत्यू होणार ! क्लायमेट इम्पॅक्ट लॅबच्या अंदाजाने खळबळ

वाढत्या उष्णतेमुळे जगभरात लाखो लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो ! असं नेमकं काय घडणार आहे? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी, शिकागो विद्यापीठाशी संबंधित क्लायमेट इम्पॅक्ट लॅबच्या अंदाजानुसार, पुढील सहा महिन्यांत उष्णतेमुळे तब्बल ३ लाख ७० हजार लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. भारत, नायजेरिया आणि ब्राझील या देशांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आता आणखी एक धक्कादायक बाब समजून घ्या. लॅन्सेटच्या अहवालानुसार, पॅरिस हवामान करारानंतर उष्णतेमुळे होणाऱ्या वार्षिक सरासरी मृत्यूंमध्ये ३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

भारतात दरवर्षी हजारो तास लोकांना उष्णतेचा आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका सहन करावा लागतो. रात्रीच्या वाढत्या तापमानामुळे झोपेवरही परिणाम होत आहे.

म्हणूनच वेळेवर हवामानाचे इशारे, आरोग्याची काळजी आणि उष्णतेपासून बचाव करणं महत्त्वाचं आहे. तर मग मंडळी क्लायमेट इम्पॅक्ट लॅबच्या अंदाजाबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button