
लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणं अचानक बंद झालं, पण का बंद झाले, हेच समजत नसल्याने आता महिलांचा संताप वाढू लागलाय. अहिल्यानगरमध्ये महिला आणि बालविकास कार्यालयात महिलांच्या रांगा लागल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
मंडळी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र आता अनेक महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे आलेले नाहीत.
विशेष म्हणजे, पैसे का थांबले किंवा संबंधित महिला अपात्र झाल्या असतील तर नेमक्या कोणत्या कारणामुळे अपात्र ठरवलं गेलं याची कोणतीही स्पष्ट माहिती महिलांना मिळालेली नाही. त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
महिलांना कोणताही अधिकृत मेसेज किंवा सूचना मिळालेली नाही. त्यामुळे पैसे येतील या अपेक्षेने महिला सतत बँका, जिल्हाधिकारी कार्यालय आणि महिला व बालविकास कार्यालयात चकरा मारताना दिसत आहेत.
काही महिलांना अचानक पैसे बंद झाल्याने घरखर्चाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महिला संतप्त झाल्या असून प्रशासनाने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सरकारी महिलांचा रोष ओढून घेतय असे आपणास वाटते का? कमेंट करा,,





