Latest

ADCC बँक निवडणूक म्हणजेच विधानसभेची सेमीफायनल! अकोलेत सहकाराच्या आडून विधानसभेची तयारी, दिग्गज मैदानात

जिल्हा बँकेची निवडणूक फक्त सहकारी बँकेची निवडणूक नाही, कारण अकोलेत थेट विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम सुरु झालीये ! अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमुळे अकोले तालुक्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यंदा विविध मतदारसंघांसाठी तब्बल २४५ ठराव दाखल झाल्याने प्रत्येक गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

गेली अनेक वर्षे वर्चस्व राखणारे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांना यंदा उमेदवारी देता येत नसल्याने त्यांच्या जागी पत्नी भीमाबाई गायकर आणि कन्या संजीवनी शिंदे यांची नावे पुढे आली आहेत. दुसरीकडे आमदार डॉ. किरण लहामटे यांनीही पहिल्यांदाच सहकार राजकारणात उडी घेतल्याने लढत अधिकच रंगतदार झाली आहे.

अनुसूचित जमातीच्या जागेसाठी वैभव पिचड आणि अमित भांगरे आमनेसामने आहेत, तर तज्ज्ञ संचालक पदासाठी मधुकर नवले, कैलास वाकचौरे, सुरेश गडाख, शरद चौधरी आणि विकास शेठे यांच्यात चुरस वाढली आहे. त्यामुळे ही निवडणूक आता सहकारापुरती मर्यादित न राहता आगामी विधानसभा निवडणुकीची सेमीफायनल मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button