
मंडळी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जेवण करायचं तर किती खर्च येईल, असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का ? तर याचं उत्तर ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल !
मुंबईतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानांवरील कॅन्टीनच्या दरांची सध्या मोठी चर्चा सुरू आहे.
नव्या करारानुसार येथे व्हेज थाळी १२५ रुपये, नॉन-व्हेज थाळी १३० रुपये, चहा २३ रुपये, उकडीचा मोदक १५ रुपये आणि गुलाबजामून २० रुपयांना उपलब्ध असणार आहे.
राज्य सरकारने या तिन्ही ठिकाणच्या खानपान व्यवस्थेसाठी पुढील चार वर्षांसाठी सुमारे ९.८५ कोटी रुपयांचे कंत्राट मंजूर केले आहे. ही व्यवस्था अधिकृत पाहुणे, अधिकारी आणि निमंत्रित व्यक्तींसाठी असून दर मात्र चर्चेचा विषय ठरले आहेत.
स्वस्त दर, दर्जेदार सेवा आणि सुरक्षित व्यवस्थेमुळे हे कॅन्टीन सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचे केंद्र बनले आहेत.





