
CDR लीक…गोळीबार…आणि मृत्यू या प्रकरणामुळे चर्चेत आलेला पोलीस कर्मचारी राहुल गुंडू याचा यापूर्वीचाही एक कारनामा चर्चेत आला आहे. त्याने एका संशयित आरोपीला फोन करून त्याच्याविरुद्ध दाखल गुन्ह्याची माहिती दिली होती.
या संदर्भात एका पोलीस कर्मचाऱ्याने वरिष्ठांकडे तक्रार केली होती. त्यासंदर्भात पोलीस कर्मचारी राहुल गुंडू याची खात्यांतर्गत चौकशी झाल्याचीही माहिती आहे. आरोपीला फोन करून त्याच्याविरुद्ध दाखल होत असलेल्या गुन्ह्याची माहिती देण्याचा गंभीर ऑडिओ क्लिप व्हायरल झाला होता.
त्यानंतरही गुंडू हा अत्यंत संवेदनशील अशा अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील मोबाईल सेल मध्ये नेमणुकीस कसा राहिला, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वीचे प्रकरण कोणी दाबले? त्याच्यावर कुणाचा हात होता?
याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. खात्यातील गोपनीय माहिती लीक करण्याचा पूर्वइतिहास असलेल्या राहुल गुंडू यांच्याविरुद्ध कठोर कारवाई होणार की त्याला पुन्हा अभय मिळणार, अशी चर्चा पोलीस वर्तुळात सुरू झाली आहे.





