Latest

शेवगावच्या शिरपेचात मानाचा तुरा…! किडनी तस्करीचं आंतरराष्ट्रीय जाळं उद्ध्वस्त करणाऱ्या शेवगावच्या भूमिपुत्राला थेट केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिष्ठेचं पदक !

परदेशापर्यंत पसरलेल्या किडनी तस्करीच्या जाळ्याचा छडा लावणाऱ्या महाराष्ट्राच्या एका पोलीस अधिकाऱ्याची आता देशपातळीवर दखल घेतली गेलीय.

विशेष म्हणजे, हा अधिकारी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याचा भूमिपुत्र आहे. नेमका कोण आहे तो अधिकारी ? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

मंडळी, ईश्वर कातकडे असं या अधिकाऱ्याचं नाव असून ते सध्या चंद्रपूरचे अपर पोलीस अधीक्षक आहेत. कंबोडियात आर्थिक अडचणींचा फायदा घेऊन भारतीय नागरिकांना किडनी विक्रीसाठी नेल्याच्या प्रकरणाचा त्यांनी एसआयटी प्रमुख म्हणून तपास केला.

या तपासात अनेक राज्यांतील मध्यस्थ, डॉक्टर आणि रुग्णालयांशी संबंधित कथित व्यवहारांचे धागेदोरे समोर आले. विशेष म्हणजे, या प्रकरणात तब्बल पाच हजार पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं.

या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झालंय. देशभरातील ४९० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. तर मग मंडळी, तुम्हाला शेवगावच्या या भूमिपुत्राची कामगिरी कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button