
मंडळी, भारतात अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहापासून होते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की फक्त 10 दिवस सकाळचा चहा बंद केला तर शरीरात काय बदल होऊ शकतात ?
पहिल्या 24 ते 48 तासांत शरीराला कॅफीनची सवय असल्यामुळे डोकेदुखी, थकवा, चिडचिड आणि कामात लक्ष न लागणे अशी लक्षणं दिसू शकतात. कारण अचानक कॅफीन बंद झाल्यावर शरीर त्याला जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतं. पण खरी मजा त्यानंतर सुरू होते!
दिवसांनंतर शरीर पूर्णपणे कॅफीनमुक्त होऊ लागतं आणि त्याचे अनेक फायदे दिसतात.
झोप अधिक शांत आणि गाढ होते
सकाळी फ्रेश वाटू लागतं
ॲसिडिटी, गॅस आणि जळजळ कमी होते
मानसिक तणाव कमी होतो
शरीर नैसर्गिक ऊर्जा तयार करू लागतं
साखर आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते
म्हणजे सुरुवातीचे काही दिवस कठीण असले तरी पुढील फायदे तुमच्या आरोग्यासाठी खूप मोठे ठरू शकतात. तुम्ही एकदा 10 दिवसांचा हा चॅलेंज घेणार का ? कमेंट नक्की करा.





