
मंडळी, पुणे-अहिल्यानगर महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रोजच्या ट्रॅफिकमुळे त्रस्त असलेल्या हजारो प्रवाशांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.
कारण पुणे ते शिरूर दरम्यान देशातील सर्वात लांब उन्नत सहा पदरी मार्ग उभारला जाणार आहे. हा प्रकल्प तब्बल 53.4 किलोमीटर लांबीचा असून त्यातील 35 किलोमीटर भाग उन्नत म्हणजेच एलिव्हेटेड असेल.
या प्रकल्पासाठी सुमारे 7,300 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे ते शिरूर प्रवासासाठी फक्त 45 मिनिटे लागणार आहेत.
येरवडा, खराडी, वाघोली, लोणीकंद, शिक्रापूर आणि शिरूर परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. तसेच अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचाही प्रवास वेगवान होणार आहे.
विशेष म्हणजे या मार्गावर पुढील टप्प्यात मेट्रो मार्गिकाही उभारली जाणार आहे. डबल डेकर फ्लायओव्हरमुळे पुण्यातील ट्रॅफिक व्यवस्थेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे-मराठवाडा कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार आहे.





