
सोनं खरेदीचा विचार करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे! मंडळी, गेल्या काही दिवसांपासून विक्रमी पातळीवर पोहोचलेल्या सोने-चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण झाली आहे.
गेल्या २४ तासांत सोन्याचा भाव तब्बल ३ हजार ५०० रुपयांनी कमी झाला आहे. तर चांदीच्या दरात तब्बल ७ हजार रुपयांची घट झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जीएसटी वगळता काल सोन्याचा दर १ लाख ५१ हजार ५०० रुपये होता.
आज तो थेट १ लाख ४८ हजार रुपयांवर आला आहे. तर चांदीचा दर २ लाख ३२ हजार रुपयांवरून २ लाख २५ हजार रुपये प्रति किलो झाला आहे.
अमेरिका आणि चीनमधील आर्थिक करारानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात निर्माण झालेल्या दबावाचा परिणाम मौल्यवान धातूंच्या दरावर झाल्याचे सांगितले जात आहे.
दर घसरल्याने आगामी सण आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सराफा बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढताना दिसत आहे.





