Latest

पाथर्डीच्या मढीतील श्री कानिफनाथ मंदिरात धक्कादायक प्रकार; मंदिरातील बाथरूममध्ये ​साधू आणि महिलेचे नग्न अवस्थेत नको ते कृत्य

ज्या देवस्थानात लाखो भाविक श्रद्धेने दर्शनासाठी येतात, त्याच ठिकाणी घडलेल्या एका घटनेने संपूर्ण अहिल्यानगर हादरले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी येथील श्री चैतन्य कानिफनाथ देवस्थानाच्या बाथरूममध्ये एका तथाकथित साधूला एका महिलेसोबत नग्न अवस्थेत आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.

या घटनेचा व्हिडिओ मढी गावचे सरपंच संजय मरकड यांनी समाजमाध्यमांवर दिल्यानंतर मोठी खळबळ उडाली. संबंधित महिला स्वतः त्या ठिकाणी गेली होती की तिला जबरदस्तीने नेण्यात आले होते, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

विशेष म्हणजे, या प्रकरणी अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती आहे. संजय मरकड यांनी श्री चैतन्य कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांवर गंभीर प्रश्न उपस्थित करत साधू आणि संबंधित ट्रस्टींवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या घटनेनंतर मढी गावात आणि भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, आता पोलिस आणि प्रशासन पुढे काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button