Latest

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलल्या जाणार ? अहिल्यानगरसह राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींच्या मतदारयादीला स्थगिती !

ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी सुरू असतानाच मोठा ट्विस्ट आलाय ! अहिल्यानगरसह राज्यातील शेकडो ग्रामपंचायतींच्या प्रारूप मतदार यादीला अचानक स्थगिती देण्यात आली. नेमकं कारण काय ?

मंडळी, अहिल्यानगर जिल्ह्यातील ८४३ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार होती. मात्र, राज्यभर ऑनलाइन मतदार यादी प्रसिद्ध करताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया स्थगित केली आहे.

आता मतदार यादीसाठी नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही विविध कारणांमुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, आयोगाने १५ एप्रिल २०२६ रोजी अस्तित्वात असलेली विधानसभा मतदार यादी वापरण्याचा निर्णय घेतल्याने, त्यानंतर नाव नोंदवलेल्या नवमतदारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादीबाबत आयोग काय निर्णय घेतो आणि निवडणुकांचे नवीन वेळापत्रक कधी जाहीर होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button