
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात एक धक्कादायक पुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका पीडित महिलेने पोलिसांत जबाब देत सांगितलं की, बाबू साळवे नावाच्या इसमाने तिच्यावर वर्षभर लैंगिक अत्याचार केला.
सागर बेग व सोनू बेग या साथीदारांच्या मदतीने हे कृत्य केल्याचा आरोप महिलेने केल्याने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी, मुलांना गायब करण्याची भीती दाखवत महिलेला तब्बल सहा महिने मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला. आरोपींनी तिला ब्लॅकमेल करत सतत फोन करून दहशत निर्माण केली.
ती दहशत इतकी होती की तक्रार करण्यासही ती घाबरत होती! सोनू बेग सध्या दुसऱ्या प्रकरणात जेलमध्ये असल्याचं समजताच पीडितेने धाडस दाखवत पोलिसांकडे धाव घेतली.
पोलिसांनी शस्त्र कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.





