Latest

शाळा डिजिटल झाली…पण मुलांच्या स्वच्छतागृहांची अवस्था कधी सुधारणार ? अहिल्यानगर मधील 400 शाळांमधील धक्कादायक वास्तव

अहिल्यानगर जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांचा कायापालट सुरू आहे. विद्यार्थ्यांना टॅब, इंटरॅक्टिव्ह पॅनल, संगणक प्रयोगशाळा आणि नव्या वर्गखोल्यांसारख्या सुविधा मिळत आहेत. मात्र, दुसरीकडे ४०० हून अधिक शाळांमध्ये मुलांच्या स्वच्छतागृहांची दुरवस्था कायम असल्याचे चित्र आहे.

कुठे स्वच्छतागृहाला पाणी नाही, तर कुठे दरवाजे तुटलेले आहेत. काही ठिकाणी ड्रेनेज, फरशी आणि छताचीही अवस्था खराब आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

जिल्ह्यात ३५३४ हून अधिक शाळांमध्ये २ लाख २५ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळांच्या डिजिटल सुविधांबरोबरच मूलभूत गरजांकडेही लक्ष देण्याची मागणी होत आहे.

शाळानिहाय सर्वेक्षण करून स्वच्छतागृह दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी द्यावा, अशी अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीसाठीही निधीची गरज व्यक्त होत आहे.

डिजिटल शिक्षण महत्त्वाचेच… पण स्वच्छ आणि सुरक्षित शाळाही तितकीच गरजेची!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button