Latest

कॅनमध्ये डिझेल दिल नाही म्हणून श्रीगोंद्यातील नागवडे यांच्या पेट्रोल पंपावर राडा; पाचपुते बंधूंसह १५ जणांवर गुन्हा

“७ लिटर डिझेल नाकारलं… आणि पेट्रोल पंप थेट रणांगण बनलं !” घटना घडलीये श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी येथे. मंडळी, काष्टीच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर काही तरुण डिझेल कॅनमध्ये भरण्यासाठी आले होते.

मात्र, शासकीय नियमांनुसार कॅन किंवा बाटलीमध्ये सुटे पेट्रोल-डिझेल देण्यास मनाई असल्याने पंप मालक कृष्णा नागवडे यांनी नकार दिला. यानंतर सुरुवातीला शाब्दिक वाद झाला आणि संबंधित तरुण तेथून निघून गेले.

पण काही वेळातच मोठा जमाव पुन्हा पंपावर दाखल झाला. आरोपींनी मालक आणि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली, केबिनच्या काचा फोडल्या आणि पंपावरील साहित्याची तोडफोड केली. या हल्ल्यात काही कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हा पंप नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांचे बंधू दीपक नागवडे यांच्या मालकीचा आहे. आता या प्रकरणी विशाल पाचपुते, अभिजित पाचपुते, प्रतीक पाचपुते यांच्यासह १५ जणांविरोधात श्रीगोंदे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button