
अहिल्यानगरमधील साताळकर लोटस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एक अत्यंत दुर्मिळ आणि यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया पार पडली आहे. महाराष्ट्रातील पहिली आणि भारतातील दुसरी अशी रोबोटिक किडनी शस्त्रक्रिया साडेचार वर्षांच्या चिमुकल्यावर करण्यात आली.
ही शस्त्रक्रिया अत्याधुनिक SSI Mantra 3.0 Robotic System च्या मदतीने करण्यात आली.लहान मुलाला किडनीचा गंभीर त्रास होता. त्यामुळे त्याची वाढ होत नव्हती, तो व्यवस्थित जेवत नव्हता आणि सतत आजारी राहत होता.यानंतर डॉक्टरांनी रोबोटिक शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.
याबाबत डॉ. हर्षवर्धन तन्वर यांनी बोलताना सांगितले कि अवघ्या तीन टाक्यांच्या ह्या शत्रक्रियेनंतर बाळाला कोणतीही मोठी इजा झाली नाही आणि अवघ्या 24 तासांत बाळ उठून बसले रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे शरीरावर कमी जखमा होतात, रक्तस्त्राव कमी होतो आणि रुग्णाची रिकव्हरीही जलद होते.
विशेषतः लहान मुलांसाठी ही तंत्रज्ञान मोठी आशेची किरण ठरत आहे. अहिल्यानगरसाठी ही वैद्यकीय क्षेत्रातील अभिमानास्पद आणि ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे.





